नागपूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत

November 8, 2008 5:08 AM0 commentsViews: 4

6 नोव्हेंबर, नागपूरनागपूर टेस्टच्या आजच्या तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा ओपनर सायमन कॅटिचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आपली पाचवी सेंच्युरी ठोकली. व्ही सी ए स्टेडिअमच्या पीचकडून फास्ट बॉलर्सना कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे कॅटिच आणि हसी या कालच्या नाबाद जोडीने शर्मा आणि झहीर खान यांना आरामात खेळून काढलं. पहिल्या अर्ध्या तासातच कॅटिचने आपली सेंच्युरी पूर्ण केली. काल तो 92 रन्सवर नॉट आऊट होता. दुसर्‍या बाजूने माईक हसीनेही आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केलीय. त्याची ही बारावी हाफ सेंच्युरी होती. आजच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल तो चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवत मोठा स्कोअर करण्याचा. सिरीजमध्ये ते शून्य – एकने मागे आहेत. त्यामुळे ही टेस्ट ड्रॉ झाली तरी बोर्डर गावसकर ट्रॉफी भारताच्या ताब्यात जाईल.

close