हसनअली प्रकरणी अशोक देशभ्रतार निलंबित

March 22, 2011 6:32 PM0 commentsViews: 1

22 मार्च

हवालाकिंग हसन अली सीडी प्रकरणी डीसीपी अशोक देशभ्रतार यांना अखेर निलंबित करण्यात आलंय. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधानसभेत ही घोषणा केली. सीआयडीने देशभ्रतार यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. पण आम्ही त्यांना निलंबित केलं असं आर.आर पाटील यांनी सांगितलं.

देशभ्रतार यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी आपली बाजू मांडावी असंही आर.आर. म्हणाले. तसेच हसन अलीला पोलीस कोठडीत चांगली वागणूक मिळावी म्हणून अशोक देशभ्रतार यांनी युसूफ लकडावाला मार्फत एक कोटी रुपयांची लाच मागितली होती असा आरोपही आर आर पाटील यांनी विधानसभेत केला.

हसनअली प्रकरणी आज विधानसभेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी निवेदन केलं. पण या निवेदनावर विरोधकांचं अजिबात समाधान झालं नाही. विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हसनअली प्रकरणातून सरकारची अजूनतरी सुटका झालेली नाही असचं दिसते.

हसनअली प्रकरण मंगळवारी विधिमंडळात चांगलंच गाजल याच कारणं होत देवेन्द्र फडणवीस यांनी केलेला आरोप. हसनअली प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी डीसीपी अशोक देशभ्रतार यांनी सुप्रीम कोर्टात इन्टरवीन पीटीशन दाखल करण्याची परवानगी गृहखात्याकडे मागितली. या परवानगीवर निर्णय घेण्याएवजी सरकारने त्यांच निलंबन केलं. यामुळे सरकारने या प्रकरणी खुलासा करावा अशी मागणी देवेन्द्र फडणवीस यांनी केली होती. मंगळवारी आर आर पाटील यांनी सभागृहात या आक्षेपावर निवेदन दिलं.

2010 साली अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेन्द्र फडणवीस यांनी एक सीडी सभागृहासमोर ठेवली होती. या सीडीमध्ये मुंबई आयुक्त पदावर हसन गफुर यांची नेमणुक करण्यासाठी अहमद पटेल,आर आर पाटील, आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये आपण मिटिंग केली असा गौप्यस्फोट हसन अलीनं केला होता. या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. याच सीआयडीने दिलेल्या अहवालाच्या आधारे देशभ्रतार यांच निलंबन केलं असा दावा सरकारने केला आहे.

या प्रकरणी विरोधक आक्रमक आहेत. विधिमंडळाबरोबर संसदेतही हा मुद्दा गाजला. त्याचबरोबर हसनअली आणि महाराष्ट्राच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक संबंधाबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.या सर्व प्रश्नांची उत्तर जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत सरकारच्या मानगुटीवरुन हसनअलीचं भुत उतरेल असं वाटत नाही.

close