फुकुशिमा प्रकल्पाजवळ धोका कायम

March 21, 2011 6:00 PM0 commentsViews: 3

21 मार्च

फुकुशिमा दायची अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणच्या धोका अजूनही कायम आहे. त्यातच आता फुकुशिमा आणि परिसरातल्या दूध आणि भाजीपाल्यांमध्ये किरणोत्सारी पदार्थांचे अंश आढळून आलेत. पाण्यात रेडिओऍक्टीव्ह आयोडीनचं प्रमाण वाढल्यामुळे उघड्यावरचं पाणी पिऊ नका असा इशारा जपान सरकारने तेथील नागरिकांना दिला आहे. पण इतर भागात किरणोत्सर्गाचा धोका फारसा नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय. दरम्यान, फुकुशिमातील रिऍक्टर नंबर 2 आणि 3 मधून आज धूर निघाल्याचं दिसून आलं. याचं कारण अजून समजलं नसल्याचं जपानच्या अणुसुरक्षा संस्थेनं म्हटलं आहे.

close