मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

March 22, 2011 10:12 AM0 commentsViews: 5

22 मार्च

मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. जळगावमधील शिवाजी पुतळ्याजवळची ही घटना आहे. 7 कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतला. अंगावर केरोसीन घेवून पेटवून घेण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला.

तर औरंगाबादमध्येही मराठा समाजाला राखीव जागा देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली. विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे संघटनेने लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं. टीव्ही सेंटर चौकात छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापट झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अंगावर रॉकेल ओतूनही घेतलं. दरम्यान, छावाच्या पंधरा कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

close