थॉमस प्रकरणी दिशाभूल केली नाही – मुख्यमंत्री

March 22, 2011 6:00 PM0 commentsViews: 3

22 मार्चथॉमस प्रकरणी विधानसभेची दिशाभूल करण्याचा प्रश्नच येत नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. सीव्हीसी थॉमस प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत निवेदन दिलं. 2007 मध्ये थॉमस केरळचे मुख्य सचिव होते. तसेच 2008 मध्येही त्यांनी संसदीय कार्यसचिव, दूरसंचार सचिव या खात्यांच्या सचिवपदीही काम केलंय. त्यामुळे त्यांच्या संदर्भात आणखी चौकशी करण्याची गरज नव्हती असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

त्याचबरोबर 2007 मध्ये तत्कालीन मुख्य दक्षता आयुक्तांनी पी जे थॉमस यांची नियुक्ती करण्यास कोणतीही अडचण नाही असा स्पष्ट निर्वाळा दिला होता. या पत्राची प्रत मी पंतप्रधानांकडे पाठवली होती असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मी कोणतीही दिशाभूल करण्याचा प्रश्नच येत नाही असंही ते म्हणाले.

close