सेहवाग ऑस्ट्रेलिया विरूध्द मॅचमध्ये खेळणार

March 22, 2011 10:40 AM0 commentsViews: 1

22 मार्च

अहमदाबादला होणार्‍या क्वार्टर फायनलसाठी टीम इंडिया सज्ज होत आहे. आणि भारताचा ओपनर वीरेंद्र सेहवाग दुखापतीतून बरा झाला आहे आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मॅचसाठी तो खेळेल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. चेन्नईला झालेल्या मॅचमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे सेहवाग खेळू शकला नव्हता. त्याच्याऐवजी तेंडुलकर आणि गौतम गंभीरने मॅचमध्ये ओपनिंग केली होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मॅचमध्ये सेहवाग खेळणार आहे. पण यामुळे सुरेश रैना आणि युसूफ पठाण यापैकी एकाला टीमच्या बाहेर बसावं लागणार आहे.

close