लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंच्या दौर्‍याला सुरुवात

March 22, 2011 10:43 AM0 commentsViews: 1

22 मार्च

भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी लोकपाल कायदा आणण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी राज्यभरातील लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. नाशिकपासून अण्णांच्या या दौर्‍याला सुरुवात झाली. या दौर्‍याच्या माध्यमातून अण्णा लोकपाल विधेयाकाची गरज लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. केंद्राच्या पातळीवर लोकपाल तर राज्याच्या पातळीवर लोकायुक्त हे कायदे करावेत अशी मागणी अण्णांनी केली. भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई करणारे हे कायदे लोकांच्या सहभागातून व्हावेत अशी त्यांची मागणी आहे.

close