बराक ओबामांची शिकागोमध्ये पत्रकार परिषद

November 8, 2008 5:45 AM0 commentsViews: 3

8 नोव्हेंबर, शिकागोअमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शिकागोमध्ये पत्रकार परिषद घेतली. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ओबामा यांची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. यात त्यांनी अमेरिकेच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेची पुन्हा घडी बसवण्याचं आश्वासन दिलं. 20 जानेवारीला अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर परिवर्तनाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होईल, असं ते म्हणाले. यावेळी ओबामा यांच्याबरोबर त्यांनी नव्यानं नेमलेल्या आर्थिक सल्लागार मंडळाचे 17 सदस्य होते. त्यात भावी उपराष्ट्राध्यक्ष जॉन बायडेन यांचाही समावेश होता.

close