महागाई भत्यामध्ये 6 टक्याने वाढ

March 22, 2011 11:04 AM0 commentsViews: 6

22 मार्च

केंद्रीय कर्मचार्‍याच्या महागाई भत्यामध्ये 6 टक्याने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आज हा ठराव पास करण्यात आला. 1 जानेवारीपासून ही वाढ लागू होणार आहे. या निर्णयामुळे 50 लाख पेक्षा अधिक कर्मचारी आणि 38 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

close