संसद परिसरात शिवजयंती साजरी

March 22, 2011 11:49 AM0 commentsViews: 2

22 मार्च

दिल्लीच्या संसद परिसरातही आज शिवजयंती साजरी झाली. शिवसेना आणि भाजपाच्या खासदारांनी संसद परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. नियमात बसत नसल्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी संसद परिसरात शिवजयंती साजरी करायला परवानगी नाकारली होती. पण शिवसेनेच्या खासदारांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केले. यावेळी भाजपचे महाराष्ट्रातील खासदार प्रकाश जावडेकरही उपस्थित होते. शिवसेना नेते मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष असताना शिवरायांचा अश्वारुढ पुतळा संसद परिसरात बसवण्यात आला होता.

close