आरोपींची माहिती देणार्‍याला 1 लाखाचे बक्षीस

March 22, 2011 12:04 PM0 commentsViews: 2

22 मार्च

नागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे हिच्या हत्येला 12 दिवस उलटलेत. पण अजून मारेकर्‍यांची माहिती मिळाली नाही. मोनिकाची हत्या करणार्‍या आरोपींची माहिती देणार्‍याला सरकारनं एक लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलंय. तसेच राज्य सरकार साक्षीदाराला सुरक्षा पुरवण्याची घोषणाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. नागपूरमध्ये भरदिवसा मोनिकाची हत्या करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी शेकडो नागरिक हजर होते. पण आरोपींची माहिती देण्यासाठी त्यापैकी कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश येतंय. या हत्याकांडामुळे पोलीस आणि प्रशासनावर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींची माहिती देणार्‍यास अखेर राज्य सरकारने बक्षिस जाहीर केलंय. दरम्यान, मोनिकाच्या हत्येचं गूढ कायम असतानाच नंदनवन भागातच इंजिनिअरींगच्या एका विद्यार्थ्यानं रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन पोटे असं या विद्यार्थ्याचे नाव आहे.

close