रत्नागिरीत मांडवी किनार्‍याला लाटांचा धोका

March 22, 2011 12:30 PM0 commentsViews: 3

22 मार्च

रत्नागिरीच्या मांडवी किनार्‍याजवळच्या वस्तीला गेल्या दोन दिवसांपासून समुद्राच्या लाटांचा जोरदार तडाखा बसतोय. त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. तसेच नारळाच्या बागा उध्वस्त होऊन वस्तीलाही धोका निर्माण झाला आहे. पण यानंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांमध्ये भितीचं वातवरण आहे तसेच यावर प्रशासनाने लवकरात लवकर काही उपाय योजना करावी अशी मागणी तेथील नागरिक करत आहे.

close