साखर निर्यातीवरील बंदी उठवली

March 22, 2011 1:35 PM0 commentsViews: 2

22 मार्च

साखरेवर लावण्यात आलेली निर्यातबंदी आज अखेरीस उठवण्यात आली. पाच लाख टनांपर्यंत साखरेच्या निर्यातली परवानगी देण्यात आली आहे.दिल्लीत झालेल्या अन्नविषयक मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. आज मंगळवारी संध्याकाळी झालेल्या या बैठकीत मंत्रिगटाचे प्रमुख प्रणव मुखर्जी, कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, वाणिज्य मंत्री आनंद शर्मा उपस्थित होते. साखरेच्या किमती किरकोळ बाजारात खाली आल्या आहेत. आणि मोठ्या प्रमाणात साखरेची निर्मिती होत आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र सरकार आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केली होती. तसेच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारही निर्यातबंदी उठवण्याच्या बाजूनं होते. त्यामुळे वाणिज्य मंत्रालयाचा विरोध असतानाही हा निर्णय घेण्यात आला.

close