पुण्यात दोन वर्षात 2,229 नागरिक बेपत्ता

March 22, 2011 2:11 PM0 commentsViews: 4

22 मार्च

पिंपरी चिंचवड परिसरातून गेल्या वर्षभरात शेकडो नागरिक अचानक बेपत्ता झाल्याच उघडकीस आलं आहे. यात अनेक महिलांसह अल्पवयीन मुले आणि मुलींचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षभरातील या घटनामुळे पोलिसांपुढे नवं आव्हान उभे ठाकले आहे.

पिंपरी-चिचंवड शहरातील इनामदार कुटुंबावर गेल्या वर्षी 13 मार्च रोजी दुखाचा डोंगर कोसळला. या कुटुंबातील मोठा मुलागा विशाल अचानक बेपत्ता झाला. पिंपरी-चिचंवड, निगडी, भोसरी, सांगवी आणि हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात तब्बल 2,229 नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी 1233 जणांचा शोध लागला. पण 349- पुरुष, 376- महिला, 159- मुली, 92- मुलं अशा 976 जणांचा अद्यापही शोध लागु शकलेला नाही. आणि पोलीस मात्र ही जबाबदारी पालकांची आहे असं सांगत स्वत:वरची जबाबदारी झटकत आहे. पण तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप तक्रारदार करतायत.

दोन वर्षात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक बेपत्ता होत असतील तर ही बाब गांभिर्यानं घेण्याची गरज आहे. पण पोलीस हे आव्हान पेलणार का ? असाच सवाल आता या बेपत्ता नागरिकांचे नातेवाईक विचारत आहे.

close