पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली ; हजारो लीटर पाणी वाया

March 22, 2011 5:01 PM0 commentsViews: 6

22 मार्च

उन्हाळा सुरू झाला आणि अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आणि अशातच अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेलंय. संध्याकाळी पाचच्या सुमारास 30 एमएम व्यासाची ही पाईपलाईन फुटली. पाईपलाईन गंजलेली असल्याने फुटल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पाईपलाईन फुटल्याने अंबरनाथ शहराला उद्याचा पूर्ण दिवस कमी दाबाने किंवा पाणीपुरवठा होणारच नाही अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

close