भाजपचा निशाणा पंतप्रधानांवर

March 22, 2011 6:10 PM0 commentsViews: 2

22 मार्च

कॅश फॉर वोट्स प्रकरणामुळे आज संसदेत पुन्हा एकदा जोरदार गदारोळ झाला. 2008 साली झालेल्या विश्वासदर्शक ठरावा दरम्यान काही खासदारांना लाच देण्यात आली होती अशा आशयाचा गौप्यस्फोट विकिलीक्सने केला. त्यावर निवेदन करताना पंतप्रधानांनी सभागृहाची दिशाभूल केली म्हणून त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्तावाची मागणी भाजपने केली.

आधी हक्कभंग प्रस्ताव आणा, मग बजेट पास करू अशी भूमिका भाजपने घेतली. बजेटसारख्या महत्त्वाच्या कामावरून विरोधक सवंग राजकारण करत असल्याचा आरोप सरकारने केला. विरोधकाना बोलण्याची संधी मिळत नसल्याचा आरोप करत भाजपने सभात्याग केला. त्यानंतर लोकसभेत यावर्षीचे बजेट पास करण्यात आले. दरम्यान पंतप्रधानांच्या विकिलीक्सवरच्या निवेदनावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी स्वीकारण्यात आली. उद्या दोन्ही सभागृाहामध्ये या विषयावर चर्चा होईल.

close