मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आणखी काही लष्करी अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात

November 8, 2008 6:06 AM0 commentsViews: 4

8 नोव्हेंबरमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला अटक झाली. याआधी रमेश उपाध्याय हा निवृत्त लष्करी अधिकारीही एटीएसच्या जाळ्यात सापडला. या प्रकरणात आणखीही एक लष्करी अधिकारी असल्याची चर्चा सध्या आहे. काही सेवेत असलेल्या तसंच रिटायर्ड लष्करी अधिकार्‍यांची चौकशी करण्याची शक्यता असल्याचं एटीएसच्या सूत्रांनी सांगितलंय. त्यातले दोघे लेफ्टनंट कर्नल तर एकजण रिटायर्ड लेफ्टनंट जनरल आहे. यामुळे लष्कराची प्रतिमा खराब होत आहे का ? का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय.या बॉम्बस्फोटाचा तपास सुरू असताना, लष्कराचे आणखी काही आजी माजी अधिकारी या प्रकरणात गुंतले असण्याची शक्यता, महाराष्ट्र पोलिसांनी व्यक्त केली आहे. पण अशा कृत्यांमुळे लष्कराच्या प्रतिमेला नक्कीच धक्का पोहचेल, अशी भावनाही व्यक्त होत आहे. ' जर एखादा राजकीय दबाव आणून कुणी त्याचा फायदा घेत असेल, तर देशाच्या लष्कराच्यादृष्टीनं ही मोठी हानी आहे. ', अशी प्रतिक्रिया मेजर जनरल अशोक मेहता यांनी दिली.विशेष म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी लष्कराच्या अधिकार्‍यांना अटक झाली खरी, पण त्यामागचा नेमक्या पुराव्याबद्दल पोलिसांनी भाष्य केलेलं नाही. जे अधिकारी देशाच्या संरक्षणासाठी नेमले गेले, त्यांचाच अशा घटनांमधला सहभाग लष्कराला अपेक्षितच नव्हता. त्यामुळे लष्कराची प्रतिमा कशी सावरावी, हाच प्रश्न वरिष्ठ अधिकार्‍यांना पडला आहे.

close