दिनू रणदिवे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर

March 22, 2011 5:35 PM0 commentsViews: 5

22 मार्च

राज्य सरकारचा 2010 या वर्षीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना जाहीर झाला आहेत. 26 मार्चला सह्याद्री अतिथीगृहात होणार्‍या सोहळ्यात दिनू रणदिवे यांचा गौरव करण्यात येणार आहे. एक लाख रुपये आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. दिनू रणदिवे यांचा 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता. गोवा मुक्ती संग्रामातही ते अग्रेसर होते. रणदिवे यांनी 'संयुक्त महाराष्ट पत्रिका' सुरु करून या आंदोलनाला वेगळीच धार आणली होती. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात चीफ रिपोर्टर म्हणूनही त्यांची कारकीर्दही खूपच गाजली होती.

close