गोंधळात अर्थसंकल्प सादर

March 23, 2011 9:34 AM0 commentsViews: 4

23 मार्च

अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून आज पहिल्यांदाच आपलं बजेट सादर केला. पण विधानभेच्या इतिहासात पहिल्यांदाच बजेट सादर करताना मोठा गोंधळ झाला. बजेटची सुरुवातच विरोधकांच्या घोषणाबाजीनं झाली. संपूर्ण भाषणभर घोषणाबाजी आणि गोंधळ चालला होता. त्यामुळे बजेट ऐकणंही कठीण बनलं होतं. पण या गोंधळातच अजित पवार यांनी आपलं बजेट सादर केलं. अतिशय किरकोळ कारणावरून विरोधकांनी हा गोंधळ घालायला सुरुवात केली.

संजय गांधी निराधार योजनेसह वेगवेगळ्या समित्यांमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना सहभागी करुन घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. या मागणीवरुन हा गदारोळ झाला. अध्यक्ष तसेच सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोधकांना वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याकडे अजिबात लक्ष न देता विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. नंतर बजेट सादर होताना गोंधळ घालणार्‍या आमदारांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली. तर या सगळ्या घटनेवर अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या गोंधळाचा निषेध केला. विरोधकांनी ठरवून गोंधळ घातल्याचा आरोप त्यांनी केला.

कृषी क्षेत्रासाठी खास तरतूद

राज्यांच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी खास तरतूदी जाहीर करण्यात आल्या आहेत. नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना कमी व्याजदराने कर्ज देण्यात येणार आहे. 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज 0 व्याजदराने तर 3 लाखापर्यंतचे कर्ज 2 टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांसाठी कृषी संजीवनी योजनाही जाहीर करण्यात आली. तसेच खतांचा राखीव साठा ठेवण्यासाठी खास निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. फलोत्पादनासाठी निर्यातीवर भर देण्यात येणार आहे.

त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्यात केंद्रे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 132 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाबार्डच्या सहाय्याने विविध प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच फलोत्पादनासाठी निर्यातीवर भर देण्यासाठी निर्यात केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यासाठी 132 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. अहमदनगर जिल्ह्याल्या राहता आणि यावल येथे निर्यात सुविधा केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.

कृषी

- नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजारांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज- त्यापुढच्या 3 लाखापर्यंतच्या कर्जावर 2 टक्के व्याजदर- सवलतीच्या दरात वीज पुरवठ्यासाठी 2,500 कोटी रु. – कृषी संजीवनी योजना जाहीर – ठरलेल्या मुदतीत वीज थकबाकी देणार्‍या शेतकर्‍यांना व्याज आणि विलंब आकार माफ

आरोग्य, शिक्षण आणि पोषण

- आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी 241 कोटी 95 लाख रुपयांची तरतूद- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी 166 कोटी रुपयांची तरतूद- बालकामगार निर्मूलनासाठी 16 कोटी रुपयांची तरतूद- अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी 48 कोटी रुपयांची तरतूदरस्ते विकास, ऊर्जा, उद्योग

- रस्ते विकासासाठी 2,749 कोटी रुपयांची तरतूद- एमएसआरडीसी साठी 150 कोटी रुपयांची तरतूद – राज्य लोडशेडींग मुक्त करण्यासाठी 2,300 कोटी रु. – वस्त्रोद्योग धोरणासाठी 100 कोटींची रुपयांची तरतूद

गृहनिर्माण आणि नागरी विकास

- झोपडपट्टी विकास कार्यक्रमासाठी 1,440 कोटी रुपयांची तरतूद- नागरी पायाभूत सुविधांसाठी 2,500 कोटी रुपयांची तरतूद- मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद- मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 1,432 कोटी रुपयांची तरतूद- मुंबईच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणार- विधान भवनाच्या सुरक्षेसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य

- पर्यटन प्रसिद्धीसाठी 25 कोटी रु. – अष्टविनायक मंदिर विकासासाठी 10 कोटी रु. – किल्ले विकासासाठी 20 कोटी रु. – कोकणातल्या समुद्रकिनार्‍यांवरच्या सुरक्षेसाठी 10 कोटी रु.- तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 175 कोटी रु.

वडापाव स्वस्त ; बियर महाग

विक्रीकरात वाढ झाल्याने दारु, बियर आणि कोल्ड्रीक महाग झाली आहे. तर उपहारगृहात विकला जाणार्‍या वडापाव वर 5 टक्के कर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वडा पाव स्वस्त झाला आहे. याआधी हाच कर 12.5 टक्के होता. तर पोलिसांच्या प्रलंबित घरांच्या प्रश्नांवर आज अर्थसंकल्पात तरतूद जाहीर करण्यातआली. पोलिसांसाठी 6 हजार नवीन घरं बांधण्यात येणार आहे.

क्रीडा क्षेत्राला 25 कोटींची तरतूद

राज्याचे क्रीडा धोरण ठरवण्याचं काम अंतिम टप्यात आहे. त्यातल्या प्रस्तावित योजनांसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. खो खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉल या खेळांसाठी 50 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तर नागपूर क्रीडा विभागासाठी 25 कोटी रुपये देण्यात येणार आहे. कुस्ती आणि हिंद केसरी स्पर्धेच्या बक्षिसात वाढ करण्यात आली आहे. तसेच मारुती माने यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. कुस्ती, कब्बडी स्पर्धांचं अनुदानही 50 कोटी रुपये करण्यात आलं आहे.

क्रीडा आणि युवक कल्याण

- क्रीडा आणि युवक कल्याणासाठी 25 कोटींची तरतूद- कुस्ती, कबड्डी, व्हॉलिबॉल, खो-खो स्पर्धांसाठी अनुदानात वाढ- कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ- नागपूर क्रीडा संकुलासाठी 40 कोटी रुपयांची तरतूद

मुंबईसह इतर शहरांच्या 2 हजार 94 विकास प्रकल्पांना मंजुरी राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबई शहराबरोबरच इतर शहरांसाठीही विशेष तरतूद जाहीर करण्यात आली. मुंबई शहरात प्रायोगिक तत्वावर 5 हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे काम येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच 86 शहरांच्या 2 हजार 94 विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. वीज निर्मिती केंद्र असणार्‍या शहरांच्या पायाभूत सुविधांवर ताण पडतोय. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी ग्राहकांकडून विशेष कर प्रस्तावित आहे. चंद्रपूर शहराला 500 वर्ष पूर्ण होत असल्याने तिथल्या सुधारणांसाठी अडिचशे कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी 70 कोटी रुपये घोषित करण्यात आलेत.

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

सार्वजनिक आरोग्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात

- सुविधा वाढवण्यासाठी 241 कोटी 95 लाख प्रस्तावित- 166 कोटी राष्ट्रीय ग्रामीण व शहरी आरोग्य योजनेसाठी- रक्तपेढी, एक्सरे, ईजीसी, प्रयोगशाळा या विविध सुविधा – निर्माण करण्यासाठी 24 कोटींचा निधी प्रस्तावित- वैद्यकीय महाविद्यालयंाच्या नव्या बांधकामासाठी आणि नूतनीकरणासाठी निधी- ससून हॉस्पिटल पुणे यासाठी 20 कोटी 50 लाख तरतूद- नांदेड- शासकीय महाविद्यालय- 8 कोटी 33 लाख तरतूद- कर्करोग हॉस्पिटल औरंगाबाद- 5 कोटी 43 तरतूद- औरंगाबाद, शासकीय रुग्णालयाला – 25 कोटी तरतूद- वर्धा हॉस्पिटलला – 6 कोटी तरतूद- शासकीय हॉस्पिटल- नागपूर येथे नवीन ग्रंथालय इमारत बांधकामासाठी 2 कोटी तरतूद- पशुधनाच्या वैद्यकीय उपचारांसाठी- 57 कोटी 27 लाखांची तरतूद

प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकीकरणासाठी

- सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत 780 कोटी प्रस्तावित- राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत- 500 कोटींचा निधी प्रस्तावित- अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीक पूर्व स्कॉलरशिप- 48 कोटींची तरतूद-आयटीआय आणि तंत्रनिकेतयासाठी 90 कोटींची तरतूद- बिअर, लिकरच्या विक्रीकरात 5 टक्के वाढ

150 सिंचन प्रकल्प यंदा पूर्ण करणार

- 2 लाख हेक्टर जमीन यंदा सिंचनाखाली आणणार- 60 अब्ज घनफूट पाणीसाठा पुढील वर्षात निर्माण करणार- 2772 कोटी केंद्राकडून सिंचनासाठी मिळणार – 25 मेगावॅट पेक्षा खालील जलविद्युत प्रकल्प खाजगीकरणातून पूर्ण करणार- 380 कोटींचे छोटे जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित वीज प्रकल्प

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराला सुविधा देण्यासाठी क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत 10 कोटींची तरतूद

- मिरजच्या हजरतच्या दर्गा- विकासासाठी 2 कोटी रुपये – सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्यांसाठी विशेष तरतूद – ऐतिहासिक किल्ले जतन आणि संवर्धनाला 20 कोटींची तरतूद – शिवनेरी, रायगड, प्रतापगड इथं पर्यटकांसाठी विशेष सुविधा- व्याघ्र प्रकल्पासाठी 25 कोटींची तरतूद

close