नागपूरमध्ये महिलेवर हल्ला

March 23, 2011 10:25 AM0 commentsViews: 2

23 मार्च

नागपुरातील मोनिका किरणापुरे हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच काल रात्रीही नागपूरमध्ये आणखी एका 22 वर्षाच्या महिलेवर प्राणघातक हल्ला झाला. इतवारी भागातील आदमाशा चौकात हा प्रकार घडला. तिच्या प्रियकरानंच तिच्यावर चाकुने वार केला आहेत. या घटनेत शरीर विक्रय करणारी ही महिला गंभीर जखमी झाली. नागपूरच्या रहाटे हॉस्पिटलमध्ये तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे मोनिका किरणापुरेच्या प्रकरणात पोलिसांकडे साक्षीदार नाहीत तर या प्रकरणात साक्षीदार असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाहीय. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना घडली आहे. घटनेनंतर हल्लेखोर मात्र मोकाट फिरत असल्याचं चित्र आहे.

close