वानखेडे स्टेडियमला कडेकोट बंदोबस्त

March 23, 2011 10:52 AM0 commentsViews: 1

23 मार्च

2 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या वर्ल्ड कपच्या फायनलवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. आणि त्यामुळे फायनलसाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहेत. हल्ल्याचे संकेत मिळण्याआधी फायनल मॅचसाठी 6 ते 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार होता. पण आता यात दुपट्टीने वाढ करण्यात आली.

याआधी प्रत्येक 15 फुटांवर पोलीस तैनात करणार होते. ते आता प्रत्येकी दोन फुटावर तैनात करण्यात येणारे आहे. एस. आर. पीच्या 2 कंपनी तैनात करण्यात येणार होत्या तर त्यात वाढ करुन आता 4 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच अगोदर शीघ्र दलाची 2 पथकं तैनात करण्यात येणार होती. तर त्यात वाढ करुन आता 5 शीघ्रकृती दलाची पथक तैनात करण्यात येणार आहेत. इतकचं नाही तर 100 पेक्षा जास्त साध्या वेशातील पोलिस मॅचदरम्यान वानखेडेवर असतील आणि एटीएसचे विशेष पथकही तैनात करण्यात आलं आहे.

close