पुण्यात बेपत्ता मुलींचे मृतदेह सापडले

March 23, 2011 8:20 AM0 commentsViews: 3

23 मार्च

बारावीची परीक्षा संपल्यानंतर दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या पुण्यातील दोन्ही मुलींचे मृतदेह आज नाल्यात सापडले. 21 मार्चला हडपसरमधील आकुताई विद्यालयातील विद्यार्थीनी प्रियांका ओव्हाळ आणि कोमल पवार यांनी भूगोलाचा पेपर दिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने पालकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

दोघींची दप्तरं नाल्याकाठी आढळल्याने पोलिसांनी अग्नीशामक दलाच्या सहाय्यानं शोध सुरू केला. त्यानंतर आज 23 मार्चला सकाळी प्रियांकाचा तर दुपारी कोमलचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात तसेच प्रियांकाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परीक्षा झाल्यानंतर मैत्रीणींसोबत रंगही या मुलींनी खेळला होता. रंग धुण्याकरता त्या नाल्यात उतरल्या असाव्यात आणि पाय घसरून पडल्या असाव्यात अशी माहितीही प्राथमिक तपासातून पुढे आल्याची पोलिसांनी सांगितले आहे. .

close