गोंधळ घालणार्‍या आमदारांना निलंबित करण्याची मागणी

March 23, 2011 11:56 AM0 commentsViews: 6

23 मार्च

विरोधकांच्या गदारोळातच आज अर्थसंकल्पाला सुरुवात झाली. मात्र विधानसभेत विरोधकांनी मोठा गदारोळ केला. संजय गांधी निराधार योजनेसह विविध समित्यांमध्ये विरोधी पक्षाच्या आमदाराना सहभागी करुन घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. या मागणीवरुन हा गदारोळ झाला. यावेळी सभागृहात घोषणाबाजी करण्यात आली. तर बजेट सादर होताना गोंधळ घालणार्‍या आमदारांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदारांनी केली आहे.

close