राज्य लावणी महोत्सवाला दिमाखात सुरुवात

March 23, 2011 12:09 PM0 commentsViews: 89

23 मार्च

महाराष्ट्र राज्य लावणी महोत्सवाला मंगळवारी मुंबईत एनसीपीए थिएटरमध्ये सुरवात झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या लावणी महोत्सावाचं उद्घाटन करण्यात आलं. या लावणी महोत्सवाची सुरवात शाहीर विठ्ठल उमप यांचा मुलगा नंदेश उमप याने खास गण गाऊन केली. लावणी महोत्सावाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री आर.आर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या लावणी महोत्सवात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून 9 लावणी पथकं आपली कला सादर करणार आहेत.

close