काश्मीरमध्ये निवडणुकांची धामधूम सुरू

November 8, 2008 6:53 AM0 commentsViews: 2

8 नोव्हेंबर, काश्मीरस्थलांतरित काश्मीरी लोक आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही उमदेवारांना तर गेल्या दोन दशकांपासून आपल्या मतदार संघापासून लांब रहावं लागलं आहे.' जम्मू काश्मिर नॅशनल युनायटेड फ्रंट ' हा काश्मीरमधल्या स्थलांतरितांनी स्थापन केलेला हा पहिला पक्ष आहे. संपूर्ण भारतात पसरलेल्या जवळजवळ 70 हजार स्थलांतरितांवर त्यांनची मदार आहे. जास्तीत जास्त स्थलांतरितांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या पक्षाचे 15 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण साधारण सगळेचं उमेदवार जम्मू काश्मिरबाहेरचे आहेत.या पक्षाचा उमेदवार राकेश हंडूनं आपला प्रचार नार्गोताच्या स्थलांतरित छावणीपासून सुरु केला आहे. हंडूनं जम्मू काश्मीर सोडून आता वीस वर्ष झाली आहेत. पण आता तो आपल्या जन्मगावी म्हणजेच हजरतबाल मध्ये परतला आहे. ' कोणात्याही परिस्थितीत आता मी काश्मीर सोडणार नाही. म्हणूनच मी निवडणुकीला उभा रहात आहे. ' असं राकेश हंडू यांनी सांगितलं.हजरतबाल भाग हा स्थलांतरितांचा आहे. अर्थातच या भागात आपलं महत्त्व वाढवण्यासाठी जम्मू काश्मीर युनायटेड फ्रंट निवडणुकीवरचं बहिष्कार टाकण्याची भाषा करत आहे. पण आता या युद्धात बाजी मारणार, याचं उत्तर येत्या निवडणुकीतच मिळेल.

close