हसन अलीच्या सीएच्या पुण्यातील घरावर ईडीचा छापा

March 23, 2011 2:15 PM0 commentsViews: 6

23 मार्च

कोट्यवधी रुपयांचा कर चुकवून काळा पैसा परदेशात लपवणारा हसन अली सध्या इडीच्या कोठडीत आहे. पण आता त्याच्या सहकार्‍यांवरही ईडीने नजर वळवली आहे. हसन अलीचे सीए सुनिल शिंदे यांच्या पुण्यातील घरावर ईडीनं आज सकाळी छापे टाकले आहे. शिंदे हे सध्या मुंबईत आहेत. पण या छाप्यात ईडीच्या नेमकं काय हाती लागलं हे अजून समजू शकलेलं नाही. उद्या अकरा वाजता शिंदे यांना मुंबईतील नरिमन पाईंट भागातील अंंमलबाजावणी संचनालयाच्या ऑफिसमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हसन अली हा फक्त आपला क्लाएंट असून अली सारखे आपले शेकडो क्लाएंट आहे त्यामुळे आपल्याघरावर अंमलबाजावणी संचनालयाने टाकलेला छापा हा अयोग्य असल्याच हसन अली यांचे सीए सुनील शिंदे यांनी सांगितल आहे.

close