जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचे मुंबईत आंदोलन

March 23, 2011 4:39 PM0 commentsViews: 2

23 मार्चमुंबईत जेएनपीटीसाठी संपादित केलेल्या जागेपैकी 12.5 टक्के जमीन ही मालकाला परत करण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी करळ फाट्यावर आंदोलन केलं. 25 गावातील हजारो नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. पालकमंत्री सुनिल तटकरे यांनी जेएनपीटीनं ही मागणी मान्य केल्याचे पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. गेली 27 वर्ष आंदोलक ही मागणी करत होते. की जेवढी जमीन जेएनपीटी एखाद्या शेतकर्‍याकडुन घेईल त्याच्या 12.5 टक्के जमीन त्या शेतकर्‍याला परत मिळावी. काही वर्षार्ंपूर्वी ही जमीन देण्याची मागणी मान्य झाली होती पण तीची अंमलबजावणी केली जात नव्हती. म्हणून आज हे बेमुदत आंदोलन सुरु केलं होतं. रस्त्यांबरोबर या आंदोलकानी रेल्वेही काही काळ अडवून ठेवली होती.

close