घरकामगार संघटनेचं धरणे आंदोलन

March 23, 2011 4:43 PM0 commentsViews: 1

23 मार्च

राज्य सरकारने घरकामगार कल्याण मंडळ कायद्याद्वारे घर कामगारांना विमा, पेन्शन आणि शिक्षणासारख्या बाबींची हमी दिली. पण त्याची अंमलबजावणी अजूनही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आणि महाराष्ट्र घरकामगार संघटनेनं धरणे आंदोलन केलं. 2009 -10 च्या अर्थसंकल्पात 22 लाख घर कामगारांची फसवणूक केली. त्यामुळे सरकारने घर कामगारांसाठीच्या विधेयकाच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम जाहीर करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

close