‘हवामान तुमच्यासाठी’ कुलाबा वेधशाळेत प्रदर्शन

March 23, 2011 4:47 PM0 commentsViews: 4

23 मार्च

कुलाब्यातील वेधशाळेकडे काल अनेक लहान विद्यार्थ्यांसोबतच मोठ्यांची पावलदेखील या वेधशाळेच्या आवाराकडे वळली होती. जागतिक हवामान दिनानिमित्त 'हवामान तुमच्यासाठी' या थीमवर आधारीत प्रदर्शन भरलं होतं. वेधशाळेचं काम नेमक कशाप्रकारे चालते याची माहिती सांगणारे अनेक तक्ते, नकाशे आणि उपकरणं या प्रदर्शनात मांडली होती. जीपीआरएसच्या मदतीनं 'रेडिओसॉन्ड' हे उपकरण वापरुन हवामानातील वरच्या पट्‌ट्यातील हवामान मोजलं जातं. डोपलर रडार अशा हवामानशास्त्राशी निगडीत अनेक यंत्रणांची माहिती शाळकरी मुलांनी करुन घेतली.