हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचं निधन

March 23, 2011 4:58 PM0 commentsViews: 4

23 मार्च

हॉलिवूडच्या दिग्गज आणि नेहमी चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचं लॉस एंजलिसमध्ये निधन झालं. त्या 79 वर्षांच्या होत्या. एलिझाबेथ टेलर यांच्या अनेक भूमिका गाजल्या. विशेष करून नॅशनल वेलवेट, क्लिओपात्रा आणि हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ ? हे त्यांचे सिनेमे विशेष गाजले. त्यांची 7 लग्न, त्यांची लाइफ स्टाइल यामुळेही त्या विशेष चर्चेत राहिल्या. पण आपल्या अप्रतिम अभिनयाने त्यांनी अनेक दशकं हॉलिवूडवर राज्य केलं.

close