मार्गारेट अल्वांना हाय कमांडकडून समज

November 8, 2008 7:09 AM0 commentsViews: 6

8 नोव्हेंबर काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्राच्या प्रभारी मार्गारेट आल्वा यांना पार्टी हायकमांडने कडक शब्दांत इशारा दिला आहे. पक्षातल्या अंतर्गत बाबींची बाहेर चर्चा करू नये, असं त्यांना बजावण्यात आलं आहे. मार्गारेट यांनी काल पक्षातल्या तिकीटवाटप प्रक्रियेवर टीका करून काँग्रेसला घरचा आहेर दिला होता. ' घराणेशाहीचा आरोप नको म्हणून, पक्षाने कर्नाटक निवडणुकांमध्ये आपल्या मुलांना तिकीट नाकारलं. पण आता पाच राज्यांत होणार्‍या निवडणुकांमध्ये काँग्रेसने कित्येकांच्या नातेवाइकांना उमेदवारी दिली. ' म्हणून आपण दुःखी असल्याचं अल्वा यांनी म्हटलं होतं. कर्नाटक निवडणुकीत तिकीटं विकली गेल्याचा आरोपही मार्गारेट आल्वा यांनी फेटाळून लावला आहे.

close