अर्थसंकल्पात गोंधळ घालणारे 9 आमदार वर्षभरासाठी निलंबित

March 24, 2011 4:24 PM0 commentsViews: 3

24 मार्च

विधानसभेत काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकानी गोंधळ घातला होता. दरम्यान गोंधळ घालणारे 9 आमदार निलंबित करण्यात आले आहेत. विनोद घोसाळकर, हरिष पिंपळे, विजय शिवतारे, विजय देशमुख, गिरीष महाजन, एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक, सरदार तारासिंग, रवींद्र वायकर या 9 आमदारांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईनंतर विरोधीपक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. महत्वाचं म्हणजे यामध्ये मनसेचा एकही आमदार नाही.

या कारवाईनंतर विरोधीपक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. महत्वाचं म्हणजे निलंबित आमदारांत मनसेचा एकही आमदार नाही. दरम्यान आमदारांवरील कारवाईवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच मतभेद असल्याचं कळतंय. गोंधळी आमदारांचं निलंबन करु नये असं मत मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या मंत्र्यांनी व्यक्त केलं. पण विरोधकांनी राष्ट्रवादीच्या नेत्याला कोंडीत पकडण्याचाप्रयत्न केला. त्यामुळे गोंधळी आमदारांचे निलंबन करण्याचा आग्रह राष्ट्रवादीच्या आमदारांनी धरला अखेर अजित पवारांनी 9 आमदारांनी निलंबित करण्यावर शिक्कामोर्तब केलं.

close