चिंटू शेख हल्ला प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे

March 24, 2011 9:16 AM0 commentsViews: 10

24 मार्च

मुंबई हायकोर्टाने चिंटू शेख हल्ला प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी चिंटू शेख यांच्यावर गोळीबार केल्याचं हे प्रकरण आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि ए आर जोशी यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला. चिंटू शेख याने 23 सप्टेंबर 2010 रोजी पवई पोलिसांकडे राणे यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची तक्रार नोंदवली होती.

मात्र नारायण राणे यांच्या दडपणामुळे पोलीस योग्य तो तपास करत नाही अशी याचिकाही चिंटू शेखने हायकोर्टात दाखल केली होती. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता. हायकोर्टाने या प्रकरणी पोलिसांना व्हिडिओ आणि पंचनामा तसेच साक्षीदार याबद्दलचा पुरावा कोर्टाकडे सोपवायला सांगितलं होतं.

close