पुण्यात रंग बरसे…

March 24, 2011 10:49 AM0 commentsViews: 3

24 मार्च

सांस्कृतिक राजधानी पुण्यातही जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात येत आहे. बच्चेकंपनीसह तरुणाई या आनंदात सामील झाली आहेत. कुठे नाक्या नाक्यावर येणार्‍या जाणार्‍यांना रंगात भिजवलं जातंय. तर कुठे डीजेच्या तालावर आनंदानं मनसोक्त रंग खेळत मित्राना रंगात न्हाऊ घातलं जातंय. भोई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रंग बरसे या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं. अनाथ आणि एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी या रंगपंचमीचेआयोजन याही वर्षी करण्यात आले होते. या पंचमीत महापौरही यात सहभागी झाले होते.

close