आदर्श घोटाळा प्रकरणी 10 लष्करी अधिकारी दोषी

March 24, 2011 10:14 AM0 commentsViews: 5

24 मार्च

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी चौकशी करणार्‍या लष्कराच्या चौकशी आयोगाने 10 लष्करी अधिकार्‍यांना दोषी ठरवले आहे. यात दोन माजी लष्कर प्रमुखांचा समावेश आहे. तशा प्रकारचा रिपोर्टच लष्कराने संरक्षण मंत्रालयाला पाठवला आहे. दोषी अधिकार्‍यांमध्ये माजी लष्करप्रमुख दीपक कपूर आणि एन.सी. वीज यांचा समावेश आहे. तसेच लेफ्टनंट जी.एस. सिहोता, लेफ्टनंट पी. के. रामपाल, लेफ्टनंट शंतनू चौधरी, लेफ्टनंट तेजिंदर सिंग, मेजर आर.के हुडा, मेजर ए.आर.कुमार, मेजर व्ही.एस.यादव आणि मेजर टी.के.कौल यांचा समावेश आहे.

close