राघव बहल यांचं ‘सुपरपॉवर’ आता मराठीत

March 24, 2011 10:56 AM0 commentsViews: 3

24 मार्च

जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या चीनचा दबदबा आहे. सुपर पॉवर झालेल्या चीनशी भारत बरोबरी करू शकेल का हा प्रश्न सध्या जगभर विचारला जातोय. नेटवर्क 18 चे संस्थापक संपादक राघव बहल यांनी या विषयावर लिहिलेलं `सुपरपॉवर` हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे आज सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झालं. अमेय प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. नीता कुळकर्णी यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहेत. चीननं केलेल्या प्रगतीची कहाणी आणि भारतातली परिस्थिती याचा अभ्यासपूर्ण आढावा या पुस्तकात घेण्यात आला. मूळ इंग्रजीत आल्यानंतर पहिल्यांदा मराठीतच हे पुस्तक आता अनुवादीत झालं आहे.

close