पॉन्टिंग परतला ; कांगारूंची अडीचशेवर उडी

March 24, 2011 11:59 AM0 commentsViews: 4

24 मार्च

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अमहदाबादच्या मोटेरा स्टेडियमवरची क्वार्टर फायनल रंगदार अवस्थेत आहे. ऑस्ट्रेलियाने अडीचशेवर रन्सचा टप्पा पार केला आहे. पण त्यांचे चार बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. आर अश्विननं वॉट्सनला आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. पण यानंतर हॅडिन आणि पॉण्टिंगने इनिंग सावरली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 70 रन्सची पार्टनरशिप केली. हॅडिनने हाफसेंच्युरी ठोकली. पण यानंतर लगेचच युवराजने त्याला आऊट केलं. मायकल क्लार्क युवराजची दुसरी विकेट ठरली. क्लार्क आठ रन्स काढून आऊट झाला. तर झहीर खानने माईक हसीला बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. तर व्हाईटच्या पाच बळी घेण्यात ही भारतीय गोलंदाजाना यश प्राप्त झालं आहे. दरम्यान कॅप्टन पॉण्टिंगने वन-डेमधील आपली 79 वी हाफ सेंच्युरी ठोकली. आणि या वर्ल्ड कपमधील ही त्याने आत्तापर्यंतचा आपला हायएस्ट स्कोअरही केला.

close