हसन अलीच्या जवळच्या सहकार्‍याला अटक

March 24, 2011 12:41 PM0 commentsViews: 6

24 मार्च

हवाला किंग हसन अलीच्या जवळच्या सहकार्‍याला अंमलबजावणी संचालयाने आज मुंबईत अटक केली. काशीनाथ तपोरिया असं त्याचं नाव आहे. हसन अलीने कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.तपोरियाच्या मदतीनं हसन शस्त्रास्त्रांचा व्यवसाय करायचा असं बोललं जातं. ईडीनं काल हसन अलीचे सीए सुनील शिंदे यांंच्या पुण्यातील घरावरही छापा टाकला होता. शिंदे यांना आज मुंबईतील नरिमन पाईंट भागातील ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेत.

close