शिवसेनाप्रमुखांना अटक करा – गुरुदास कामत

November 8, 2008 7:25 AM0 commentsViews: 11

8 नोव्हेंबर, मुंबईकाँग्रेसचे खासदार गुरुदास कामत यांनी शिवसेना प्रमुखांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातली आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग हिला पाठिंबा देणार्‍यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ' भाजप आणि शिवसेना प्रमुखांनी सरळ सरळ साध्वी प्रज्ञा सिंगचं समर्थन केलं आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा देणार्‍यांची खरी जागा जेलमध्येच आहे, असं ते म्हणाले.'मालेगाव बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या संशयावरून साध्वी प्रज्ञा सिंगला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात हिंदुंना टार्गेटकरण्यात येत असल्याचा आरोप करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिला पाठिंबा जाहीर केला होता. त्यावर गुरुदास कामत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

close