कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे 220 कोटींचा सरकारला तोटा

March 24, 2011 1:09 PM0 commentsViews: 1

24 मार्च

कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करण्यार्‍या शुंगलू समितीने या घोटाळ्यात झालेल्या एकूण तोट्याची रक्कम जाहीर केली. सरकारला या घोटाळ्यामुळे 220 कोटी रुपये इतका प्रचंड तोटा सहन करावा लागल्याचं समितीचं म्हणणं आहे. आणि याकरता शुंगलू समितीने दिल्लीचे राज्यपाल तेजिंदर खन्ना यांना दोषी ठरवलं आहे. या मध्ये एमार एमजीएफ या रिअल इस्टेट कंपनीवरसुध्दा आरोप करण्यात आले असून त्यांनी 64 कोटी रुपयांची बेकायदेशीर बीलं काढल्याचं समितीचं म्हणणं आहे.

close