पहिल्या आधार कार्डधारक नंदुरबारमध्ये कार्डासाठीवीजचोरी

March 24, 2011 1:14 PM0 commentsViews: 1

24 मार्च

देशातील पहिलं आधार कार्डधारक होण्याचा मान मिळालेल्या नंदुरबारमध्ये चक्क वीजचोरी करुन आधारकार्डांचं काम सुरु असल्याचं उघड झालंय. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत इथं या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. आता याच शहाद्यात हा प्रकार उघड झाला आहे. शहादा नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक 9 मध्ये चाललेल्या याप्रकाराबद्दल नागरिकांनी वीज कंपनीकडे तक्रार केली. त्यानंतर वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. आणि संबधित ठेकेदारावर गुन्हा नोंदवणार असल्याचं वीज कंपनीचं म्हणणं आहे.

close