महापालिकेने खरेदी केलेले 9 हजार हायड्रंट बंद

March 24, 2011 1:22 PM0 commentsViews: 4

24 मार्च

मुंबई महानगरपालिकेने 4.42 कोटीचे हायड्रंट खरेदी केलेत. सर्व हायड्रंट खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने रद्दबातल ठरवला. मुंबईमध्ये एकूण 10 हजार 157 हायड्रंट्स आहेत. त्यापैकी जवळपास 9 हजार हायड्रंट बंद आहेत. बांद्रा पूर्व भागातल्या गरिबनगर वस्तीत ज्यावेळी आग लागली. त्यावेळी सुद्धा त्याभागातील सर्वच्या सर्व म्हणजे 110 हायड्रंट बंद होते. पण यासंदर्भात कुठल्याही कंत्राटदारावर बीएमसीने अजून कारवाई केलेली नाही. आणि आता नवे हायड्रंट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो राज्य सरकारनं रद्दबातलं ठरवल्याने राज्य सरकार आणि बीएमसीत वाद रंगणार असं दिसतं आहे.

close