सुनेच्या धमकीला कंटाळून सासरच्या चौघांची आत्महत्या

March 24, 2011 1:28 PM0 commentsViews: 7

24 मार्च

सुनेच्या वेगळं राहण्याच्या धमकीला कंटाळून पुण्याच्या बावधन भागात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. 20 मार्च रोजी ही घटना घडली. मात्र चार दिवसानंतर आज ही घटना उघडकीला आली. पुण्याच्या बावधनमधील पॉश आदित्य शगून सोसायटीमध्ये ही घटना घडलीय. ए. एन. विष्णुवर्धन, ए एन इंदीरा, एन टी नारायण, मधुसुदन अशी मृतांची नावं आहेत. सून सतत वेगळं राहण्याची धमकी देत असल्यामुळे पती, दिर आणि सासू-सासर्‍यांनी विष पिऊन आत्महत्या केली. मृतदेहांच्या बाजूला सुसाईड नोटमध्ये सून धमकी देत असल्याचे लिहिण्यात आली. हे कुटुंब मूळचं तामीळनाडूतील मदुराईचंआहे. आज विष्णुवर्धन यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांच्या शेजार्‍यांनी पोलिसांना बोलावलं तेव्हा ही घटना उघडकीला आली.

close