त्यांने जमवले सचिनचे 20 हजार फोटो !

March 24, 2011 1:31 PM0 commentsViews: 15

24 मार्च

आपल्या देशात क्रिकेट म्हणजे सर्वांचा जीव की प्राण आणि वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पवर्णीच असते. मॅच पाहायला होणारी करोडो लोकांची गर्दी बघून लोकांच्या क्रिकेट प्रेमाची खात्री पटते. एकट्या सचिन तेंडूलकरचे करोडो फॅन आहेत.असाच एक फॅन शेवगावमधील ग्रामीण भागात राहतोय. त्याचं नाव आहे तुकाराम विघ्ने. लहानपणापासून त्याला सचिनचे फोटो जमवण्याची आवड आहे. तुकारामकडे सचिनचे साडेपाच हजार फोटो आहेत. त्याला सचिनचे 20 हजार फोटो जमा करुन सचिनने 20 हजार रन केल्यावर भेट द्यायचे आहेत.

close