गुलाबी रंगात न्हाऊन निघालं सातार्‍यातील बावधन

March 24, 2011 2:17 PM0 commentsViews: 58

24 मार्च

सातारा जिल्ह्यातील बावधन हे गाव फक्त गुलाबी रंगात न्हाऊन निघालं आहे निमित्त आहे बगाड यात्रेचं. बावधनच्या बगाड यात्रेत फक्त गुलालाची उधळण केली जाते. लाकडापासून तयार केलेल्या बगाडाला 40 ते 50 फुटांवर नवस केलेल्या बगाड्याला बांधलं जातं. गावच्या शिवारातून बैलाच्या जोडीच्या सहाय्याने ओढत गावातील श्री काळभैरव मंदिरापर्यंत आणलं जातं. हे लाकडी बगाड ओढताना बैलांचा चांगलाच कस लागतो. दरवर्षी फाल्गुन महिन्यात तीन महिन्यात तीन दिवस ग्रामदैवत भैरवनाथ काशिनाथाची यात्रा भरते. भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड मिरवणूक असे कार्यक्रम पार पडतात. यंदा बगाड्या होण्याचा मान केशव अरविंद भोसले यांना मिळाला.

close