बिल्डर सानिया काद्रीच्या परवानगी नसलेले बांधकाम पाडले

March 24, 2011 3:24 PM0 commentsViews: 3

24 मार्च

बिल्डर सानिया काद्रीच्या परवानगी नसलेल्या घरांचे बांधकाम भुसावळ नगरपालिकेने आज पाडले. पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी आणि बिल्डर सानिया काद्री या दोघांमधील वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खडका रोड भागातील राधाकुंज सोसायटीतील पाचही बंगले अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. 18 पोलीस अधिकारी, 150 होमगार्ड्स आणि 120 पोलीस कर्मचारी एवढ्या प्रचंड बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कायद्यानुसार रितसर नोटीस दिल्यामुळे हे बांधकाम पाडले जाणार हे निश्चित होते. याविरूद्ध सानिया काद्रीने कोर्टापुढे स्थगितीचीही परवानगी मागितली होती. पण ते न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.

close