जपानमध्ये मृत आणि बेपत्ता व्यक्तींचा आकडा 26 हजारांच्या वर

March 24, 2011 5:36 PM0 commentsViews: 3

24 मार्च

जपानमधल्या सुनामीतल्या मृत आणि बेपत्ता व्यक्तींचा आकडा 26 हजारांच्या वर गेला आहे. जपानमधील एनएचके वर्ल्ड या चॅनेलनं हे वृत्त दिलंय. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातला रेडिएशनचा धोकाही कायम आहे. तिथ काम करणार्‍या 3 कर्मचार्‍यांना रेडिएशनची मोठी लागण झाल्याचं आढळून आलंय. अणुप्रकल्पातील 3 नंबरच्या रिऍक्टरमध्ये केबल्स जोडताना त्यांना रेडिएशनची लागण झाली होती. 50 जणांच्या वेगवेगळ्या गटात जवळपास 300 कर्मचारी तिथं रात्रंदिवस काम करत आहेत.

close