2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी जेपीसी आणि लोकलेखा समितीत जुंपली

March 24, 2011 5:50 PM0 commentsViews: 8

24 मार्च

टू जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी जेपीसीची स्थापन तर करण्यात आली आहे. पण आता त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. या महाघोटाळ्याच्या आर्थिक बाजूची चौकशी आधीपासूनच संसदेची पीएसी म्हणजे लोकलेखा समिती करत आहे. या समितीचे अध्यक्ष भाजपचे मुरली मनोहर जोशी आहेत. तर आता नव्याने स्थापन झालेल्या जेपीसीचे अध्यक्ष काँग्रेस नेते पीसी चाको आहेत. जेपीसीचा आवाका पीएसीपेक्षा मोठा आहे. पण अनेक बाबींचा तपास दोन्ही समिती एकाच वेळी करत असल्यामुळे घोळ होतोय असं जोशींचं म्हणणं आहे. चाकोंनी मात्र याचा इन्कार केला आहे. दोन्ही समित्यांचं कार्यक्षेत्र वेगवेगळ आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि पीएसीनं धोरणात्मक गोष्टींत हस्तक्षेप केल्याबद्दल टीकाही केली.

close