सोनिया पंतप्रधान झाल्या तर केस कापून, चणे खाईन – स्वराज

March 24, 2011 5:56 PM0 commentsViews: 6

24 मार्च

संसदेचं बजेट अधिवेशन संपत आलं असतानाच आज सुषमा स्वराज यांनी आयबीएन नेटवर्कला खास मुलाखत दिली. सीव्हीसी थॉमस प्रकरणी पंतप्रधानांनी चूक कबूल केल्यावर स्वराज यांनी या विषयावर पडदा टाकल्याचं जाहीर केलं होतं. पण नंतर भाजपने वेगळी भूमिका घेतली होती. याविषयी पक्षाने आपल्याला भूमिका बदलालया भाग पाडल्याची कबुली सुषमा स्वराज यांनी दिली. तसेच सोनिया गांधी अजूनही पंतप्रधान होणार असतील तर आपण केस कापून, चणे खाऊन जगू, असा निश्चय नव्याने व्यक्त केला.

close