आमदार निलंबन प्रकरणी विरोधक आक्रमक

March 25, 2011 9:14 AM0 commentsViews: 2

25 मार्च

आमदार निलंबन प्रकरणी विरोधकांच्या बहिष्कारानंतरही विधानसभेचं कामकाज सुरू झालंय. लक्षवेधीवर चर्चा सुरू आहे. 9 आमदारांच्या निलंबनावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज आज 1 तासासाठी तहकूब करण्यात आलं. तसेच विरोधकांशी चर्चा करण्याची सूचना अध्यक्षानी सरकारला केली. विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, बाळा नांदगावकर, सुभाष देसाई आणि अबू आझमींची बैठक झाली. निलंबनाच्या कारवाईनंतर शिवसेना, भाजप आणि मनसे हे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आमदारांचे निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय विरोधकानी घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायर्‍यांवर काळ्या फिती लावून ठिय्या आंदोलन केलं. सरकार लोकशाहीची थट्टा करत असल्याचा आरोप विरोधकानी केला. विधान परिषदेतही विरोधी पक्षाच्या आमदारानी कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधकांचा बहिष्कार कायम राहिला तर घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

close